Nigdi: तडीपार गुंडाला शस्त्रांसह अटक
एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड(Nigdi) विनापरवाना शहरात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास परशुराम चौक, निगडी येथे करण्यात आली.
निहाल महमद शेख (वय 25, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक(Nigdi) केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आतिश कुडके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Moshi: भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निहाल शेख याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 17 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक कोयता देखील आढळला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.