Moshi: भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिली. त्यात (Moshi)वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी सव्वा अकरा वाजता संतनगर मोशी येथे घडली.

लक्ष्मण शंकर कायते (वय 68, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) असे मृत्यू झालेल्या (Moshi)व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक लक्ष्मण कायते (वय 44) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांचे वडील गोडाऊन चौकाकडून संतनगर चौकाकडे पायी चालत जात होते. संतनगर चौकाजवळ आल्यानंतर त्यांना भरधाव आलेल्या वाहनाने धडक दिली. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला. या अपघातात गंभीर जखमी होऊन लक्ष्मण कायते यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.