Pimpri : पिंपरी परीसरातील 32 ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरा जंक्शनच्या 289 बॅटरी चोरीला
एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल 32 ठिकाणच्या ( Pimpri )सीसीटीव्ही कॅमरा जक्शंनच्या 289 बॅटरी चोरून नेण्यात आल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि.15) रोजी उघडकीस आली.
याप्रकरणी राकेश आत्माराम गोळे (वय 42 रा.उंड्री) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्या विरोधाात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi : महावीर जयंतीनिमित्त दिल्लीत निर्वाण महोत्सव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाणे हद्द्दीमध्ये असलेल्या 32 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमराच्या जंक्शनच्या एचबीएल कंपनीच्या 289 बॅटरी चोरून नेल्या आहेत. . हा प्रकार 24 ते एप्रिल ते 15 मार्च 2024 या कालावधीत घडली आहे. त्यातील एक बॅटरीची किंमत ही 2000 रुपये असून एकूण 5 लाख 78 हजार रुपयांच्या बॅटरी चोरून नेल्या आहेत. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात ( Pimpri ) गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.