Small Finance Bank : एयु, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकांना नियमित बँक होण्याची संधी 

एमपीसी न्यूज – रिझर्व बँक ऑफ इंडियाने पात्र लघु वित्त बँकांकडे (स्मॉल फायनान्स) नियमित बँकांमध्ये रूपांतर ( Small Finance Bank) करण्यासाठी अर्जांची मागणी केली आहे. यामुळे एयु, इक्विटास, उज्जीवन यांसारख्या अनेक लघु वित्त बँकांना नियमित बँक होण्याची संधी निर्माण झाली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

https://twitter.com/RBI/status/1783835263367823410?t=EUhSXRBk_QK33rKfFOVxKQ&s=19

नियमित बँक होण्यासाठी किमान 1000 कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह इतर निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. रिझर्व बँकेने नोव्हेंबर 2014 मध्ये खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या परवान्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. मात्र तत्कालीन लघु वित्त बँकांचा व्यवसाय पसारा वाढत असल्याने रिझर्व बँकेने त्यांना नियमित बँकांचा दर्जा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

नियमित बँक बनण्यासाठी लघुवित्त बँकेचे समभाग सूचीबद्ध केलेले असावे. डिसेंबर 2019 मध्ये रिझर्व बँकेने लघु वित्त बँकांना नियमित अथवा सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित होण्याचा मार्ग प्रदान केला. मागील दोन आर्थिक वर्षांमध्ये ज्याचा निव्वळ नफा आणि एकूण बुडीत कर्ज आणि निव्वळ बुडीत कर्ज अनुक्रमे तीन टक्के आणि एक टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

भांडवल जोखीम मालमत्ता प्रमाण (सीआरएआर) किमान पाच वर्षांची कामगिरी समाधानकारक असावी. भारतात अर्थव्यवस्था विस्तारित होत आहे. त्याचबरोबर मध्यमवर्ग वाढत आहे. छोट्या आणि मोठ्या उद्योगांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतात मोठ्या बँकांबरोबरच छोट्या बँकांची गरज वाढली आहे. या दृष्टिकोनातून रिझर्व बँकेने बँकांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्मॉल फायनान्स बँकांना नियमित बँकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला ( Small Finance Bank) आहे.

https://www.youtube.com/watch?v=xHEi1EoGYIQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.