Suicide news : महिलेच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – महिलेच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.28) काळेवाडी येथे घडली आहे.

जोमेन जॉय कुट्टी (वय 34 रा. विजयनगर काळेवाडी) असे मयत इसमाचे नाव असून जोमेन यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन महिलां विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

धमकी देत महिलेवर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचा मुलगा जोमेन यांच्या सोबत आरोपी महिलेने फोटो असल्याचे सांगून ब्लॅकमेल करत  जोमेन यांच्याकडून पैसे व सोने घेतले. हा प्रकार सन 2016 पासून सुरु होता. मात्र तो फोटो जोमेन यांच्या पत्नीला दाखवण्याची धमकी देत दोन्ही आरोपी महिलांनी पुन्हा पैशांची मागणी करत त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या धमकींना कंटाळून जोनेम यांनी अखेर आत्महत्या केली. यावरून जोमेन यांच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.