Pimpri : महामेट्रोची रिक्षा चालकांसाठी जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज – महामेट्रो, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी- चिंचवड शहरातील रिक्षा चालकांसाठी रिक्षा वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाशिक फाटा चौक कासारवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी आणि महावीर चौक चिंचवड येथे ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (मार्गिका एक) गौतम बिऱ्हाडे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, महामेट्रोचे सुरक्षा अधिकारी किशोर करांडे, व्यवस्थापक बापूसाहेब गायकवाड, पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर, पोलीस निरीक्षक आबासाहेब म्हसवडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी रिक्षाचालकांशी संवाद साधला. यांनी रिक्षाचालकांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, सुरक्षेच्या दृष्टीने कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत माहिती सांगितली.

हॅरिस ब्रिज (बोपोडी) ते संत मदर तेरेसा ब्रिज (चिंचवड) या दरम्यान महामेट्रोचे काम सुरु आहे. वाहतूक सुरळीत राहावी, अपघात होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी व दुचाकी चालकांनी ग्रेड सेपरेटर मध्ये वाहने वेगाने चालवू नयेत, ओव्हरटेक करू नयेत, मद्यपान करून वाहने चालवू नयेत, वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नये; यांसारख्या सूचना देण्यात आल्या. तसेच मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी कामाची यंत्र सामुग्री आत बाहेर केली जाते.  मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी आजूबाजूची वाहने पाहून सावधानता बाळगून चालकांनी वाहने चालवावीत, असे आवाहनही रिक्षा चालकांना करण्यात आले.

या मोहिमेत स्वराज्य रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष पिराप्पा धोत्रे, महाराष्ट्र रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष नजीर गुलाब शेख, शिव मल्हार रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष नितीन साखरे, बुरुटे रिक्षा
स्टॅन्ड पिंपरी अध्यक्ष किशोर केसवानी, एकता रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष आस्ताद रामपुरे, डॉ. आंबेडकर रिक्षा स्टॅन्ड राहुल अण्णा धोत्रे, हिंद रिक्षा संघटना नाना गाडे, बाबा
आढाव रिक्षा संघटना आत्माराम जावडे, साईबाबा रिक्षा संघटना अध्यक्ष सुरेश चिले, राजू वक्रनारायण इत्यादी रिक्षा संघटनांनी देखील सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.