PCMC : महापालिका शाळेतील मुलांसाठी 29 काेटींची गणवेश खरेदी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ( PCMC) विद्यार्थ्यांना गतवर्षीपासून डीबीटीव्दारे साहित्य वाटप सुरू झाले. त्यापैकी मागील करारनाम्याप्रमाणे शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर हे साहित्य पुरवठाधारांकडून खरेदी कुरून दिले जाते. आगामी 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी गणवेश खरेदी करण्यास आणि त्यासाठी आवश्यक सुमारे 29 काेटींच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी  मान्यता दिली आहे.

Chinchwad : बड्या पोलीस ठाण्यांना अभय ?

महापालिकेच्या प्राथमिक 138 शाळा, माध्यमिक 18 आणि बालवाडी 203 शाळा कार्यान्वित आहेत. त्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना शालेय वर्षे सुरु झाल्यानंतर गणवेश, पी. टी. गणवेश, स्वेटर, शालेय वह्या, दप्तर, रेनकोट, शूज, भूगोल व चित्रकला वह्या, विविध अभ्यासक्रमाची पाठपुस्तके असे शालेय साहित्य मोफत दिले जाते. मागील वर्षापासून शालेय साहित्यासाठी प्रशासनाने डीबीटीचा अवलंब केला आहे. परंतु, गणवेश, पी. टी. गणवेश स्वेटर हे साहित्य शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना झालेल्या करारातील अटी व शर्तीनुसार आणि पुणे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित तीन ठेकेदारांकडून खरेदी केले जाते.

त्याप्रमाणे महालक्ष्मी ड्रेसेस अँड टेलरिंग फर्म, श्री प्रेस्टीज गारमेट्स अँड टेलरिंग फर्म आणि श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन यांच्याकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदी करून वाटप करण्याचा निर्णयास आयुक्त सिंह स्थायी समितीची मान्यता दिली.

खरेदीसाठी सुमारे 29 कोटींची तरतूद

शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदीसाठी पालिकेच्या प्राथमिक विभागाने आगामी वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पात एकूण 22 कोटी 68 लाख 52 हजार रुपये इतकी तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. तर, माध्यमिक विभागाने या खरेदीकामी 7 कोटी इतकी तरतूद करावी, अशी मागणी केल्याचे शिक्षण विभागाच्या प्रस्ताव आहे. त्यानुसार गणवेश खरेदीवर आगामी वर्षात सुमारे 29 कोटी रुपये इतका ( PCMC)  खर्च अपेक्षित आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.