Moshi : शिवजयंतीनिमित्त मोशीत भरणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

शिवरस्ता सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – शिवरस्ता सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मोशी-चिखली शिवरस्ता येथे 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी मर्दानी खेळाचे प्रशिक्षक आणि शस्त्रांचे संग्राहक आनंद ठाकूर यांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे.

मागील पाच वर्षापासून या मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सव मो्ठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदाही शिवरस्ता येथे 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये शस्त्रांची माहिती तसे गड प्रदर्शन माहिती दिली जाणार आहे.

काय असणार शिवकालीन शस्त्रप्रदर्शनात

16 प्रकारचे दांडपट्टे समशेर, राजाराणी तलवार,मराठा धोप, उंटावरची तोफ, गेंड्याच्या कातडीची ढाल, कासवाची ढाल, अडकित्याचे असंख्य प्रकार, राजाराणी खंजीर, त्रिमुखी खंजीर चंद्रभान, कट्यारी, हस्तीदंताचे खंजीर, चिलखते, कुऱ्हाडी बंदू, माडू अशा असंख्य प्रकारांनी त्यांचे शस्त्रागार समृध्द झाले आहे. हा सगळा संग्रह आथा साडेचार हजार वस्तूंचा झाला असून, देशभरातील शस्त्रप्रकारांचे दर्शन आनंद ठाकूर यांच्याकडे होते. प्रामुख्याने पंजाब, राजस्थान, हरयाणा, इंदूर आणि महाराष्ट्रातील शस्त्रांची त्यांच्या संग्रहात समावेश आहे.

PCMC : महापालिका शाळेतील मुलांसाठी 29 काेटींची गणवेश खरेदी

असे आहेत कार्यक्रम

शिवजयंती निमित्त 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते ९ दरम्यान सोसायटीतील सांस्कृतिक कायर्खम व खाऊ गल्ली, 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर होणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 10 शिवज्योत आगमन तर दुपारी ४ ते ६ महिलांची बाईक रॅली असणार आहे. सायंकाळी 6 ते 8 भव्य मिरवणूक होईल. सायंकाळी आठ वाजता भव्य महाशिवआरती व महाप्रसाद असे नियोजन आहे.

शहर आणि मोशी परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन शिवरस्ता सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनकडून करण्यात आले (Moshi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.