PCMC : ज्यादा व्याजदरासाठी ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज – ज्यादा व्याजदरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ( PCMC) प्रशासनाने ठेवी खासगी बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील शासनाचा 22 नोव्हेंबर 2023 चे निर्णय आणि नगर विकास विभागाचे 14 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार खासगी बँकेत गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खासगी बँकेचे मूल्य 16 हजार कोटीपेक्षा अधिक असलेल्या बँकेत गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Chinchwad : एम. एस. एस. हायस्कूलच्या शार्दुल देशिंगेला भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा प्रोजेक्ट इन्स्पायर ॲवॉर्ड

त्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय फर्स्ट बँक, एक्सीस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंट बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, फेडरल बँक, बंधन बँक या नऊ बँकांची यादीही देण्यात आली आहे. या खासगी बँकेत गुंतवणूक करण्याचे सुचविण्यात आले आहे. या खासगी बँकेत महापालिका आपल्याकडे शिल्लक असलेली अतिरिक्त रक्कम गुंतवणार आहे. ( PCMC)लेखा विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी ठेवल्यानंतर कमी व्याजदर मिळतो. त्यामुळे खासगी बँका महापालिकेच्या लेखा विभागाशी वारंवार संपर्कात असतात. खासगी बँकात ठेवी ठेवल्यास ज्यादा व्याज देण्याचे आमिषही दाखविले जाते. त्यामुळे खासगी बॅकांमध्ये ठेवी ठेवण्यास पालिका प्राधान्य देत आहे. येस बँकेत महापालिकेने 984 कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर ठेवी परत मिळविण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुन्हा खासगी बँकेत ठेवी ठेवण्याचा निर्णय ( PCMC) घेतला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.