Chinchwad : एम. एस. एस. हायस्कूलच्या शार्दुल देशिंगेला भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा प्रोजेक्ट इन्स्पायर ॲवॉर्ड

एमपीसी न्यूज –  एम. एस. एस. हायस्कूल (व्ही. के. माटे विद्यालय), चिंचवड, येथे इयत्ता 6 ब मध्ये शिकत ( Chinchwad) असलेला विद्यार्थी शार्दुल प्रकाश देशिंगे याची विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट इन्स्पायर  (Project Inspire) या ॲवॉर्डसाठी निवड झाली आहे. देशभरातून एकूण दहा लाख विद्यार्थ्यांमधून निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

त्याने सुचविलेल्या प्रोजेक्टचे नाव ‘मदर केअर मॉडेल ऑफ प्रेशर कुकर ‘ (Mother Care model of pressure cooker) असे आहे. गडबडीच्या वेळी  आईच्या हाताला बसणारे  वाफेचे चटके  थांबवण्यासाठी  त्याने हे मॉडेल विकसित केले आहे.

Bhosari : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

जाएंट मे़ट्रीवेव्ह रेडीओ टोलिस्कोप (Giant Metrewave Radio Telescope) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन  सायन्स प्रोजेक्ट एक्सिबीशन अँड कॉम्पिटीशन 2023  ( online science project exhibition and competition 2023) मध्ये एम. एस. एस. हायस्कूल (व्ही. के. माटे विद्यालय ) चिंचवड येथे इयत्ता 6 ब मध्ये शिकत असलेले विद्यार्थी शार्दुल प्रकाश देशिंगे, काव्या आशुतोष साताळकर, आणि प्रियल प्रशांत पोहरे यांच्या प्रोजेक्टची निवड झाली आहे.

त्यांनी ‘plastic waste management and hydrogen generation from waste water ‘ हा प्रोजेक्ट सादर केला होता.यासाठी त्यांना शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापिका आणि पालकांचे ( Chinchwad) मार्गदर्शन लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.