Vehicle Thief Arrested : पुण्यातून गाड्या चोरून सोलापुरात नेऊन विकणारा चोरटा गजाआड; वीस दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : पुण्यातील हडपसर परिसरात 10 लाख रुपयांहून अधिक किंमतीची गाड्या चोरी करणारा अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक (Vehicle Thief Arrested) केली आहे.

अजय झेंडे (32) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून आत्तापर्यंत 20 हून अधिक दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Sinhagad News: सिंहगड किल्ल्यावर हॉटेलचे अतिक्रमण काढण्यास आज पहाटे सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय झेंडे हा मूळचा दौंड चा असून पुण्यात तो किरकोळ कामे करायचा. पुण्यातील दुचाकी चोरून नंबर प्लेट बदलून तो त्याचा सोलापूर येथील मित्र यल्लाप्पा बेल्ले (34) याला विकत असे. बेल्ले हा जशी मागणी असेल त्यानुसार झेंडेला गाडी चोरण्यासाठी सांगायचा. कधी एका विशिष्ट कंपनीची गाडी हवी असेल तर बेल्ले हा झेंडे ला ती हवीय असे सांगून संशय येऊ नये म्हणून शहराच्या बाहेरील भागातून गाडी चोर असे आदेश द्यायचा. झेंडे या गाड्या चोरून सोलापूर ला नेऊन बेल्लेकडे सोपवत असे. दौंड पोलिस ठाण्यात या आधी झेंडे वर ए टी एम फोडण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5ने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.