Vehicle Thief Arrested: मजेसाठी चोरल्या 220cc च्या गाड्या, लातूरचा 22 वर्षीय तरुण गजाआड

एमपीसी न्यूज : मौज मजा करण्यासाठी 220cc च्या पल्सर गाड्या चोरणाऱ्या एका चोरट्याच्या दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याने चोरलेल्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसहीत तिघांना ताब्यात घेतले आहे.

रोहित विष्णू क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा लातूर येथील किल्लारी गावचा रहिवासी आहे. सध्या पुण्यातील जनता वसाहत परिसरात तो राहत होता.

Police Suspended : मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या त्या तीन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना जनता वसाहत परिसरातून पल्सर दुचाकी चोरणारा चोरता जनता वसाहत परिसरातील गल्ली नंबर 8 येथे आला असल्याची माहिती मिळाली होती.. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी रोहित सह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी दुचाकी चोरण्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या चार दिवसाची जप्त करण्यात आल्या. केवळ मौजमजा करण्यासाठी त्यांनी दुचाकी चोरल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.