Vehicle Thief Arrested : वाहने चोरून त्याद्वारे घरफोडी करणारे अटकेत

एमपीसी न्यूज – वाहनांची चोरी करून त्याद्वारे घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा चारच्या तपासी पथकाने अटक केली आहे.ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.18) खंडकी परिसरात केली.

अरबाज हकीम शाह (वय 24 रा.खडकी) व यश धर्मेश कांबळे (वय 19 रा.खडकी) व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sanjay Adamane Demise : तिरंगा हॉटेलचे मालक संजय आदमाने यांचे दुःखद निधन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 10 ते 12 दिवसांपूर्वी आरोपींनी चोरीची रिक्षा व दुचाकीचा वापर करून काही दुकाने टपऱ्या फोडल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा चारचे तपासी पथक खडकी परिसरात गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, बोपोडी पुलाजवळ संबंधीत रिक्षा घेऊन आरोपी बसले आहेत. पोलिसांनी आरोपी पुलाखाली असल्याची खातरजमा करत आरोपींना घेराव घातला त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी रिक्षा (एमएच 14 जी सी 6074), प्रिंटर, दुचाकी (एमएच 12 एनजी 4753) असा एकूण एक लाख 15 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलीस तपासात आरोपींनी दुचाकी ही पुण्यातील भवानी पेठ येथून तर रिक्षा पिंपरी परिसरातून चोरल्याचे समोर आले. आरोपींवर पुंपरी तसेच देहुरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पुढील तपासासाठी त्यांना देहुरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.