Woman Molestation : भाडेकरूचे मालकीणीसोबत अश्लील चाळे, टेरेसवर नेऊन नको ते केले…

एमपीसी न्यूज : घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका व्यक्तीने घरमालकिणीसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील धनकवडी परिसरातील तळजाई पठार परिसरात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत हनुमंत लोखंडे (वय 45) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 43 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादी महिलेचा भाडेकरू आहे. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. फिर्यादी महिलेच्या पतीच्या निधनानंतर म्हणजेच 2019 पासून आरोपीने भाडे न देता फिर्यादी त्यांच्यावर वाईट नजर ठेवली. फिर्यादी या भाडे मागण्यासाठी गेल्या असता बोलायचे आहे असे म्हणून त्यांना टेरेसवर नेले.

टेरेसवर गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीला ओढून घेतले आणि मी तुला सांभाळतो असे म्हणून त्यांच्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगताच शिवीगाळ करत फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.