Sanjay Adamane Demise : तिरंगा हॉटेलचे मालक संजय आदमाने यांचे दुःखद निधन

एमपीसी न्यूज: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि तिरंगा हॉटेलचे मालक संजय आदमाने यांचे दुःखद निधन झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संजय आदमाने हे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक होते. 15 ऑगस्ट 1992 साली त्यांनी तिरंगा हॉटेलच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले होते. पुण्यातील पासोड्या विठोबा मंदिर शेजारी हे हॉटेल आजही आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आलं होते. यानंतर संजय आदमाने यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी पुण्यातील काम परिसरात बाणेर रस्त्यावर देखील तिरंगा हॉटेलच्या शाखा सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील फरगुशन रस्त्यावरही तिरंगा हॉटेलची नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.

Shreemad Bhagwat Katha : होमहवन व पूर्णाहुतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता

दरम्यान मागील काही दिवसांपासून संजय आदमाने हे आजारी होते. जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले. आदमाने यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.