Crime News : आम्हीच इथले भाई म्हणत हवेत कोयता फिरून दहशत माजवणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणाला भर रस्त्यात पडून उलट्या कोयत्याने मारहाण केली. इतकेच नाही तर ‘आम्ही येथील भाई आहोत थांब तुला दाखवतो’, असं म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवडे चौकात हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sinhagad Road Accident : सिंहगड रस्ता परिसरात भीषण अपघातात आईचा मृत्यू तर चिमुरडा गंभीर जखमी

विशाल पवार कुणाल शितोळे विशाल शितोळे आणि आकाश राखपसरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी उरळीकांचन परिसरात राहणारे आहेत. तर मारुती विभीषण गवळी (वय 28) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला.

अधिक माहिती अशी की फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीच्या आहेत, 19 तारखेच्या रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी मित्रांना सोडण्यासाठी चार चाकी वाहनाने आले होते. आरोपींनी त्यांची गाडी भरस्त्यात अडवून पूर्वीच्या कारणावरून वाद घातला. उरुळी कांचन परिसरात पुन्हा दिसायचे नाही असे चांगल्या पद्धतीने सांगितले होते, त्यावेळचा मार कमी पडला का असे म्हणून लोखंडी कोयत्याने ठार मारण्याचा उद्देशाने मारहाण केली. आम्ही येथील भाई आहोत थांब तुला दाखवतो परत इकडे फिरकायच नाही, असे म्हणून कोयता हवेत फिरवून दहशत माजवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.