Shreemad Bhagwat Katha : होमहवन व पूर्णाहुतीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता

एमपीसी न्यूज – हनुमान मित्र मंडळ आणि गुप्ता-जैसवाल फाऊंडेशन आयोजित आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभागृहात पार पडलेल्या आठ दिवसीय संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची बुधवारी (दि. 16) रोजी हवन व पूर्णाहुतीने सांगता झाली. अखेरच्या दिवशी पुर्णाहुति ब्राह्मण भोजन आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज यांनी हवन व पूर्णाहुती व इतर विधी पूर्ण विधी वैदिक मंत्रोच्चारात केले. श्रीमद भागवत कथेचे पठण केले. यावेळी वृंदावनातील कलाकारांनी कृष्ण लीलाची आकर्षक झलक सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कथा अध्यक्ष त्रिभुवन तिवारी, विजय गुप्ता, कथा सप्ताह समितीचे जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, विनोद गुप्ता, वकील गुप्ता, संजीत गुप्ता, शंकर गुप्ता, सिद्धांत गुप्ता, पंचानंद गुप्ता, भावेशकुमार गुप्ता, अनिल गुप्ता, उमाशंकर गुप्ता, शिवआज्ञा गुप्ता, अशोक गुप्ता, संतोष गुप्ता, जितेंद्र गुप्ता, सुभाष गुप्ता, प्रमोद गुप्ता, अर्जुन गुप्ता, मुन्ना गुप्ता, रवि गुप्ता आदींनी परिश्रम घेतले.

DCM Devendra Fadnavis : राज्यपालांना शिवरायांच्या कार्याची चांगली माहिती, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय – देवेंद्र फडणवीस

अखेरच्या दिवशी पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज यांनी ” जो जन्म-मृत्यू एकच करतो तो भागवत, जो भगवंत प्राप्ती करतो तो भागवत, जो जीवन सुधारतो तो भागवत. श्रीमद भागवत कथा सप्ताहात ज्ञानयज्ञाची अद्भुत प्रवाह भगवती गंगेची जाणीव करून दिली. भागवत कथा जीवनाला मृत्यूपासून मुक्त करते आणि अस्तित्वाचा सागर पार करते. धुंडूकारीसारखे पापीही सप्ताह कथा ऐकून मोकळे झाले ”, असे प्रवचनात सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजक तथा कथा सप्ताह समितीचे अध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, गेले आठ दिवस सप्ताहात वामन अवतार, श्रीराम कृष्ण जन्मोत्सव, बाल लीला, माखन चोरी लीला, चीर हरण व गोवर्धन लीला, द्वारिका लीला, रुक्मिणी मंगल, सुदामा चरित्र, परिक्षित मोक्ष शुकदेव पूजन आदी धार्मिक कथा संग्रहाचा महाराजांनी भक्तांपुढे उलगडा केला. या कार्यक्रमात जवळपास पाच हजार भाविक सहभागी झाले होते. सप्ताहास अनेक सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.