DCM Devendra Fadnavis : राज्यपालांना शिवरायांच्या कार्याची चांगली माहिती, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची चांगली माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस रविवारी रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस बल येथे महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेत बोलत होते.

Nawale Bridge Accident: नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल, प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, शौर्याची माहिती देशातील सर्वांना आहे तसेच ते राज्यपाल कोषारी यांना देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत ते आमचे हिरो आहेत. महाराजांसारखा दुसरा आदर्श आमच्या समोर नाही. मात्र राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.