Indian Oil: इंडियन ऑइल दरवर्षी फेकून दिलेल्या 2 कोटी पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करणार

एमपीसी न्यूज – इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी अनबॉटल्ड – टूवर्ड्स ए ग्रीनर फ्यूचर नावाच्या एका भव्य समारंभात एका विशेष शाश्वत व हरित गणवेशाचे अनावरण केले. हा गणवेश केवळ इंडियन ऑईलच्या तीन लाख फ्यूएल स्टेशन अटेंडंट आणि इंडेन एलपीजी गॅस डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला आहे.

या गणवेशासाठी वापरलेले कापड हे फेकून दिलेल्या व वापरलेल्या पीईटी बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहे. या उपक्रमातून 405 टन पीईटी बाटल्यांचा पुनर्वापराला चालना मिळेल. यामुळे वर्षाला 2 कोटी बाटल्यांची बचत होईल. यावेळी या सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्त्या भूमी पेडणेकर उपस्थित होत्या.

Sanjay Adamane Demise : तिरंगा हॉटेलचे मालक संजय आदमाने यांचे दुःखद निधन

यावेळी बोलताना एस. एम. वैद्य म्हणाले, “हे पर्यावरणाला अनुकूल आमच्या हरित कटिबद्धतेचे उदाहरण म्हणून झळाळून उठतील. आमचे आघाडीवरील ऊर्जा सैनिक हे गणवेश घालतील, याचा मला आनंद आहे. दरवर्षी 80 लाख मेट्रिक टन प्लॅस्टिक महासागरांमध्ये प्रवेश करते आणि सुमारे 15 कोटी मेट्रिक टन प्लॅस्टिक आपल्या सागरी परिसंस्थांमध्ये फिरत राहते. या गतीने 2050 पर्यंत समुद्रांमध्ये माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिकच असेल. प्लॅस्टिक बाटल्यांचे कपड्यांमध्ये रूपांतर करणे हे एखाद्या समस्येवर साततत्याने कार्य केले तर नव्या संधींचे दरवाजे कसे उघडतात, याचे उत्तम उदाहरण होय, असेही त्यांनी सांगितले.

इंडियन ऑईलच्या हरित उपक्रमांतर्गत, वापरलेल्या प्लॅस्टिक बाटल्या छोट्या चकत्यांच्या रूपात तोडल्या जातात आणि मायक्रो-पेलेट्सच्या स्वरूपात वितळविण्यात येतात. या हरित वस्त्रांचे विणकाम करण्यासाठी मायक्रो-पेलेट्सचे रूपांतर धाग्यांमध्ये करण्यात येते. या वस्त्राचा पर्यावरणावरील परिणाम फक्त रिसायकलिंगच्या लाभांच्याही पलीकडे असतो. हे कपडे दर्जाच्या संदर्भात विर्जिन पॉलिस्टरच्या बरोबर असतात, मात्र त्यांच्या निर्मितीसाठी लक्षणीय प्रमाणात कमी संसाधने वापरली जातात. त्यांच्या निर्मितीत जवळपास 60 टक्के कमी ऊर्जा लागते, आणि विर्जिन पॉलिस्टरच्या तुलनेत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन एक तृतीयांश कमी होते. हे कपडे झिजल्यानंतरसुद्धा वापरलेल्या पॉलिकॉटन गणवेशांचे यांत्रिक रित्या पुनर्वापर करून त्यांचे रूपांतर स्वस्त गोधडी, ब्लँकेट किंवा उंची डेनिम फॅब्रिकमध्ये केले जाऊ शकते. हे वस्त्र जागतिक पुनर्वापर प्रमाण प्रमाणपत्रांनुसार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.