Yerawada : येरवडा कारागृहातील बुद्धिबळ संघाचा इंडियन ऑईलच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – जागतिक बुद्धिबळ महासंघाने (Yerawada) नुकत्याच आयोजित केलेल्या कारागृहातील कैद्यासाठीच्या आंतरखंडीय स्वातंत्र्यासाठी बुद्धिबळ ऑनलाईन अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या येरवडा कारागृहातील सहा बंद्यांना इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी सत्कार केला.

यावेळी वैद्य यांनी इंडियन ऑईलच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांना प्रशिक्षण देणारे केतन खैरे यांचाही सत्कार केला. या अनोख्या उपक्रमाला सहकार्य पुरवणारे येरवडा कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील आणि अन्य वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांचाही वैद्य यांनी सत्कार केले.

Khadki : शाळेमध्ये वृक्षरोपण आणि रोपवाटिका तयार करण्याची कार्यशाळा

या स्पर्धेत भारतीय कारागृहांतील कैद्यांनी सहभागी होण्याची ही पहिलीच (Yerawada) वेळ होती. त्यांनी 46 देशातील 85 संघांचा सामना केला. या सहभागी झालेल्या संघाची तयारी आणि प्रशिक्षण हे वैद्य यांचीच कल्पना असलेल्या इंडियन ऑईलच्या ‘परिवर्तन – प्रिझन टू प्राईड’ या अभियानातून झाली.

इंडियन ऑईलने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ सोबत या आंतरखंडीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पहिल्यावहिल्या ‘परिवर्तन – प्रिझन टू प्राईड’ या ऑनलाईन स्पर्धेतून भारतीय संघांची निवड केली होती. यात 20 भारतीय कैद्यांनी भाग घेतला होता. पुणे व प्रयागराज कारागृहांतील संघांनी या अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली होती, तर तिहार कारागृहातील महिला व किशोर संघांनी त्यांच्या वर्गात पात्रता मिळविली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.