Khadki : शाळेमध्ये वृक्षरोपण आणि रोपवाटिका तयार करण्याची कार्यशाळा

एमपीसी न्यूज : आज खडकी (Khadki) येथील इंडियन एज्युकेशन अकॅडमीच्या जे.एस. त्यागी विद्यालयात निसर्गराजा मित्र जीवांचे आणि YTDS यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण आणि शाळेमध्ये रोपवाटिका तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

Pimpri News : भाजपकडून पुन्हा नव्या जुमल्यांना सुरुवात; रविकांत वरपे यांची टीका

यामध्ये शाळेतील सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्याना झाडांचे प्रकार, ती झाडे लावण्याची पद्धती, बियांची ओळख आणि झाडांचे रोप कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. विविध प्रकारची 100 रोपे तयार करण्यासाठी पिशव्या भरण्यात आल्या. यामध्ये राहुल घोलप, सागर वाघ आणि अक्षय पवार यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.