Pimpri : आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय – सुर्यकांत मुळे

एमपीसी न्यूज – आजचे पर्यावरण, वृक्षारोपण, (Pimpri) संरक्षण म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सुर्यकांत मुळे यांनी व्यक्त केले.

पिंपरी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकाराम नगर येथे कौमी सप्ताह दिनानिमित्त पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कौमी सप्ताह दिन हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो, अल्पसंख्यांक कल्याण, भाषिक सुसंवाद, दुर्बल घटक दिन, पर्यावरण संवर्धन दिन, महिला दिन अशी विविध दिन या सप्ताहात साजरे केले जातात, या सप्ताहात राष्ट्रीय एकात्मितेची शपथ देऊन ,मिरवणूक, चर्चा, संमेलने, चित्रपट प्रदर्शनाने असे विविध कार्यक्रम या सप्ताहात राबविले जातात.

जागतिक पर्यावरण हे पाच तारखेलाच केला जातो असे नाही हवेचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमान वाढ (Pimpri) यांच्यासाठी जनजागृती पर्यावरण हे व्यासपीठ आहे. याचा मुख्य उद्देश पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण हाच असल्याचे सूर्यकांत मुळे यांनी सांगितले. नागरीकांनी जगण्यासाठी, रस्ता वाढीसाठी वृक्षतोड केली आहे. परंतु, प्रत्येकाने ठरवले पाहिजे की माझ्यामुळे वृक्षतोड, प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Pimpri : महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आज जगामध्ये पृथ्वीचे तापमान वाढत आहे, दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळ चालला आहे, नद्यांच्या प्रदूषणात वाढ होऊन जलचर प्राण्याचे अस्तित्व धोक्यात येऊन त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होत चालला आहे. कृषी क्षेत्रावर परिणाम होत चालला आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून माझी वसुंधरा पर्यावरण राबवण्याचे शक्तीचे करावे यासाठी ग्रामविकास व नगर विकास विभागाने पुढाकार घ्यावा असे जोगदंड म्हणाले.

केंद्र प्रमुख आनिल कारळे,शैलेजा आवडे,कामगार प्रतिनिधी किशोर पुजारी, गोरखनाथ वाघमारे, नवनाथ कदम, रोहिणी मेश्राम, कवी शामराव सरकाळे,गुंगा क्षीरसागर पस्थित होते,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.