Vehicle Thief Arrested: दुचाकी चोरणाऱ्या सराईताला आळंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडील पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.2) आळंदी येथे केली आहे.

नासीर शमशुद्दीन शेख (वय 36 रा.खेड मुळ गाव-गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक आरोपी नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा साळु गावातील रॉयल हॉटेल समोरुन एक ईसम चोरीच्या दुचाकीवर बसला असल्याची खबर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी (एमएच14 सी.एन.9511) या गाडीवरून जाणाऱ्या नासीर याला अडवून चौकशी केली त्याने ही दुचाकी 27 नोव्हेंबर रोजी धानोरे येथील पेशवाई हॉटेल समोरून चोरल्याचे कबुल केले.

Election Commission of India : आळंदी मध्ये जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग नवमतदारांची नोंदणी विशेष शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

पोलिसांनी अटक करुन आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून 2 लाख 55 हजार रुपयांच्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातील पाच गुन्हे उघडकीस आले असून तीन गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही.याचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

ही कारवाई आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जोंधळे, आर. एम. लोणकर, पोलीस हवालदार बी.बी. सानप, पोलीस नाईक बी.व्ही.खेडकर, पोलीस शिपाई एन.के. साळुंखे, पोलीस शिपाई के.सी.गर्जे, जी.व्ही. आडे, व्ही.आर.पालवे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.