Pimpri : शहरातील खड्ड्यांचा प्रत्येक आठवड्याला आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून (Pimpri) पावसाची संततधार सुरू आहे. थोड्याशा पावसाने शहरातील काही भागातील रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत खड्डे बुजविले जात आहेत. तसेच खड्ड्यांचा प्रत्येक आठवड्याला आढावाही घेतला जात असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

India ws West Indies Test series : भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेल्या विक्रमी फलंदाजीमुळे बेजान सामन्यात आली जान

शहरात 2086 खड्डे होते. यापैकी 1767 खड्डे बुजविण्यात आले असून 319 खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तसेच पावसाळ्यात खड्डे बुजविण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. मात्र, शहर परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे.

याबाबत शहर अभियंता मकरंद निकम यांना विचारले असता ते म्हणाले, शहरातील कोणत्याही भागातील रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित एजन्सीला खड्डे बुजविण्याचे तत्काळ आदेश देण्यात येत आहेत. तसेच खडड्यांच्या प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी (Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.