Acharya Vidyasagar ji : जैन संत आचार्य विद्यासागर यांचे निधन

एमपीसी न्यूज – जैन धर्मियांचे दिगंबर पंथियाचे संत (Acharya Vidyasagar ji)आचार्य विद्यासागर महाराज (वय 77) यांचे छत्तीसगड मधील डोंगरगड शनिवारी (दि. 18) रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी वृद्धपकाळाने निधन झाले. डोंगरगड येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

 आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 रोजी (Acharya Vidyasagar ji)कर्नाटकमध्ये झाला. आचार्य विद्यासागर महाराज याचं मूळ नाव विद्याधर होते. त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे विद्यासागर मुनी असे नामकरण झाले. कर्नाटकच्या बेळगावमधील चीकोडच्या सदलागा या गावामध्ये विद्यासागर यांचे नववीपर्यंत शिक्षण झाले. आचार्य विद्यासागर मुनींनी 1966 मध्ये जैन मुनी आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. 30 जून 1968 मध्ये आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी वयाच्या 20 वर्षी राजस्थानमध्ये मुनी दीक्षा दिली. 22 नोव्हेंबर 1972 रोजी वयाच्या अवघ्या 26 वर्षी त्यांना आचार्य पद देण्यात आले.

 

आचार्य विद्यासागर महाराज यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संस्था आश्रम उभ्या केल्या. देशभरात हजारो गो शाळा स्थापन केल्या. विद्यासागर यांना आठ भाषा अवगत होत्या. त्यांनी मुख्य ग्रंथ मूकमाटी महाकाव्य हा संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला. त्यानंतर या ग्रंथाचे आठ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. विद्यासागर महाराज यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार, प्रचार करत हजारो मुनींना दीक्षा दिली. त्यांना जैन धर्मियांच्या दिगंबर पंथीयामध्ये सर्वोच्च असलेले आचार्य पद मिळाले होते.

Pune : जिल्ह्यातील नागरिकांना ‘शिवगर्जना’ महानाट्य पाहण्याची संधी

ते दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जात. मागील सहा महिन्यांपासून ते डोंगरगड येथे वास्तव्यास होते. आचार्य विद्यासागर महाराज यांनी मागील तीन दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केला होता. त्यानंतर ते ब्रम्हलीन झाले.

 

विद्यासागर महाराज यांनी भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले. तर, मातृभाषा जोपासण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला. अ (अज्ञान) पासून ज्ञ (ज्ञान) पर्यंतचा आपल्या संस्कृतीचा प्रवास असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले. मध्य प्रदेश आणि छतीसगड सरकारने त्यांच्या निधनानंतर अर्ध्या दिवसाचा शोक पाळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.