ACP Transfer : सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पुन्हा बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील (ACP Transfer) सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोलीस उपअधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे यांनी मंगळवारी (दि. 30) आदेश दिले आहेत.

मागील आठवड्यात राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसात सुधारित आदेश काढत कट्टे यांची बदली रद्द करण्यात आली. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी प्रेरणा कट्टे यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी दिली होती. आता प्रेरणा कट्टे यांची पुन्हा बदली झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे पोलीस उपअधीक्षक पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.

PCMC : महापालिकेच्या आयटीआय मधील 12 विद्यार्थ्यांची निवड

मंगळवारी काढलेल्या आदेशामध्ये 18 सहाय्यक आयुक्त / पोलीस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून गडचिरोली येथे बदली झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांची देखील बदली झाली आहे. प्रशांत अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे बदली झाली आहे.

‘त्या’ तपासाचे काय होणार – ACP Transfer

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्याकडे तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच कट्टे यांच्याकडे हिंजवडी येथील एका महत्त्वाच्या गुन्ह्याचा देखील तपास देण्यात आला होता. कट्टे यांची पुन्हा बदली झाल्याने या तपासाचे पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.