Wakad : रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पोलीस रेकॉर्डवरील एका अल्पवयीन मुलाला वाकड (Wakad) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोहम्मद उमर कमरे आलम तोहीर यांनी वाकड पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. 24 मे रोजी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास फिर्यादी पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
त्यानंतर वाकड (Wakad) पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून एका मुलाची ओळख पटवली. हा मुलगा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तो वाकड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहाय्यक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संतोष बर्गे, स्वप्नील खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, अजय फल्ले, तात्या शिंदे, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, कौंतेय खराडे, भास्कर भारती यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.