Pune Crime : महिलांची छेड काढणाऱ्यावर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी (Pune Crime) महिलांची सतत छेड काढणाऱ्या सराईतावर तडीपारीची कारवाई केली आहे. परिसरात महिलांची छेड काढणाऱ्यांना वचक बसावा म्हणून पोलिसांनी ही करावाई केली आहे.

नवनाथ संभाजी गिरी (वय 19 रा. खराडी) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. तो परिसरात महिलांशी असभ्य वर्तन करून त्यांची छेड काढत होता. या आधीही त्याला लोणाकंद पोलिसांनी अटक केली होती. मात्र, जामिनावर सुटताच त्याने परत महिलांची छेड काढण्यास सुरुवात केली. त्याच्या वाढत्या तक्रारी पाहून पोलिसांनी अखेर त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. आरोपीला पोलिसांनानी एक वर्षासाठी पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केले आहे.

Wadmukhwadi : फ्लॅट विकत देण्याच्या आमिषाने 8 लोकांची 52 लाखांची फसवणूक करणारा आरोपी अखेर 4 वर्षांनी अटकेत

ही कारवाई लोणीकंद पोलीस ठाण्याचे (Pune Crime) वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अमंलदार प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.