Moshi : मोशी येथे किसान 2022 कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात (Moshi) मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या किसान 2022 या 31 व्या कृषिप्रदर्शनाचे पुण्यात मोशी येथे उद्घाटन करण्यात आले. दर वर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्‍या शेतकर्‍यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन 18 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहील.

15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 500 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, 5 दिवसांमध्ये देशभरातून दिड लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे .

यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकर्‍यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे (Moshi) प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्‍या 80 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचा ही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

Pune News : पीबीएसच्या ‘नॅशनल एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड 22’ चे शनिवारी वितरण

किसान मेळाव्यात कृषी स्टार्टअप्सचे स्पार्क दालन हे प्रमुख आकर्षण असेल.साठहून अधिक कृषी स्टार्टअप्स येथे त्यांचे नवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना सादर करतील. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाअंतर्गत स्मार्ट प्रकल्प या स्टार्टअप्स आणि महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये संवाद सुरू करत आहे. यावेळी पूर्वनोंदणीची संख्या 100,000 ओलांडण्याची अपेक्षाआयोजकांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.