Pune News : वन विभागाची परवानगी न घेता उदमांजर पकडण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : वन विभागाची (Pune News) परवानगी न घेता उदमांजर पकडण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी करत पिंजरा लावून अवैधरित्या वन्यजीव हाताळल्याप्रकरणी आरोपी साईदास शंकर कुसाळ यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन विभागाच्या वतीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये संरक्षण देण्यात आलेल्या उदमांजर या वन्यप्राण्यास पकडण्यासाठी आरोपी कुसाळ यांनी वन विभागाची परवानगी न घेता वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेचे बनावट लेटरहेड तयार केले. मेरीयंट डेव्हलपर्स प्रा.लि. 299, बोट क्लब, बंड गार्डन, पुणे यांच्याकडे दरपत्रक पिंजरा रक्कम 3 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार अवैधरित्या पिंजरा लावून अवैधरित्या वन्यजीव हाताळल्या प्रकरणी आरोपी साईदास कुसाळ (रा. पुणे) याला अटक करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 2,9,16,39,49 (अ) व 51 अन्वये त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Moshi : मोशी येथे किसान 2022 कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात

वन्य प्राण्याची मुक्तता (रेस्क्यू) करण्यासाठी कोणत्याही (Pune News) प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मान्यता प्राप्त नसलेल्या रेस्क्यू संस्थेकडून पैशाची मागणी केल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या परिसरात वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरू नये. नजीकच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा वनपरिक्षेत्र कार्यालयास अथवा वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.