Pune News : पीबीएसच्या ‘नॅशनल एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड २२’ चे शनिवारी वितरण

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस) वतीने (Pune News) घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एचआर एक्सलन्स’ स्पर्धेतील विजेत्यांना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. १७ डिसेंबर) ‘हॉटेल हयात’ कल्याणीनगर, पुणे येथे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे, अशी माहिती पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

यावेळी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याचा कॉर्पोरेट जगतावर होणारा परिणाम’ यावरील परिसंवादात औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. यामध्ये वैकफिल्डचे कार्यकारी संचालक मुकेश मल्होत्रा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. पराग काळकर आदी विविध विषयांवर विचार मांडतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील या स्पर्धेत देशभरातील दोनशे प्रवेशिका आल्या, त्यापैकी ४५ जणांची निवड तज्ज्ञ परिक्षकांनी केली. या परिक्षण मंडळात सुधीर मतेती, निरज गुप्ता, संग्रामसिंह पवार, डॉ. वैभव देशमुख, डॉ. गीतिका मतदान, विनोद बिडवाई, सौरभ शाह, डॉ. गिरीश देसाई यांचा समावेश होता.

Pimpri Chinchwad : नवनियुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे स्वीकारणार पदभार

पीसीसीओईचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिनाक्षी त्यागी, डॉ. मंजू चोप्रा, डॉ. गणेश राव, जोबिझ्झा मल्टिपल सर्व्हिसेसचे गौरव शर्मा यांनी कार्यक्रमाचे आयोजन (Pune News) केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.