Pimpri Chinchwad : नवनियुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे स्वीकारणार पदभार

एमपीसी न्यूज : नवनियुक्त पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पदभार स्वीकारण्यासाठी आयुक्त कार्यालयात चिंचवड येथे आले आहेत. विनयकुमार चौबे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी काल बदली करण्यात आली होती. ते मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

अंकुश शिंदे हे सध्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा गृहविभागाने काल या बदलीचे आदेश काढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.