Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज :-भारतरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात  (Alandi) उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने माऊलींच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.

 

याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, बाळासाहेब भोसले, योगेश मठपती, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने यशवंती काढणे, रुचिका वाघमारे या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयीचे विचार व्यक्त केले.

Pimpri : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे विविध कार्यक्रम

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण करणारा वेदांत मुरकुटे याने ‘मी बाबासाहेब बोलतोय’ एकपात्री सादर केली तसेच दीपक मुंगसे, सूर्यकांत खुडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवंत विचारांना उजाळा देत महापुरुषांचे कार्य हे विशिष्ट जाती – धर्मासाठी नसून ते समस्त मानवासाठी व त्यांच्या कल्याणासाठी आहे असे सांगून त्यांच्या जीवनातील काही वेचक प्रसंगातून विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले.

या कार्यक्रमाच्या शेवटी अजित वडगावकर यांनी महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता व्यक्त करत सर्वांनी संविधान पुस्तिकेचे वाचन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. व सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार कांबळे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून व पसायदानाने झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.