BJP : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून ‘मोदी की ग्यारंटी भाजपचा संकल्प’  या नावाने हा जाहीरनामा भारतातील प्रत्येक राज्यातील गावागावात पोहोचविला जाईल. या (BJP) जाहीरनाम्यामध्ये  10 मोठ्या घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत.

आज (दि.14) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात पूर्ण उत्साहाने साजरी होत असताना दिसून येत आहे. या शुभदिनाचे औचित्य साधून  भाजपाने पक्षाच्या मुख्यालयात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (BJP) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला असून यावेळी पंतप्रधान मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व इतर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते.

Pune : आझम कॅम्पसचे मिरवणुकीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये खालील घोषणांचा उल्लेख केला आहे.

रोजगार आणि उद्योजकतेवर भर

गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधले जाणार

मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षासाठी चालू राहणार

पाईपमार्फत स्वस्त गॅस  घराघरात  पोहोचणार

मुद्रा योजनेंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार

आयुषमान  भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार

कृषी क्षेत्रावर विशेष भर

कोट्यवधी कुटुंबाचे वीजबिल शून्य करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणार

70 वर्षांवरील वृद्ध, तृतीयपंथीना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार

3 कोटी महिलांना लखपती दीदी करणार

महिलासक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जाणार, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शिक्षण, पर्यटन , आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.