Kartiki Ekadashi : ॲड परांजपे विद्यालय हरिनामाचा जयघोषाने दुमदुमले

एमपीसी न्युज – ॲड. पु. वा परांजपे विद्या मंदिरमध्ये कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त दिंडी सोहळा पार पडला. पालखीचे पुजन उद्योजक विलास काळोखे यांंच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी,संत ज्ञानदेव,निवृती,सोपान, मुक्ताई,संत तुकाराम यांची वेशभूषा परिधान करून हरिनामाचा जयजयकार करत विद्यालयातून विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव व शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, माजी पर्यवेक्षक महादेव थोरात, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar’s Birthday : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अजित स्वाभिमान सप्ताहा’चे आयोजन

शाळेतील अनेक विद्यार्थांनी विविध अभंग गौळणी म्हटल्या तसेच लेझीम पथकाने सर्वांची मने जिंकली. तळेगाव मधील सोसायटीतील नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

प्रमुख अतिथी विलासशेठ काळोखे यांनी विद्यार्थ्यांना शाळा,शिक्षक, आपली संस्कृती यांचा आदर केला पाहिजे असे विचार व्यक्त केले. नंदकुमार शेलार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन सुजाता कातोरे यांनी केले.

दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी दिंडी प्रमुख वैशाली कोयते,धनंजय नांगरे शरद जांभळे,नरेंद्र इंदापुरे, संपत गोडे, विवेक मुळे,अनिता नागपुरे,नयना पारीठे,अरुणा भिलारे, संतोष घरदाळे गंगाराम सुपे,गंगाराम खंडागळे यांंच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.