Talegaon Dabhade: ॲड शलाका खांडगे यांच्या शोकसभेचे तळेगावात आयोजन

एमपीसीन्यूज : तळेगाव पंचक्रोशीतील सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील धुरीण म्हणून ओळखल्या जाणारया डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष दत्तात्रय खांडगे यांची कन्या युवा विधिज्ञा कै. ॲड. शलाका संतोष खांडगे यांचे शुक्रवार (दि 8) अकस्मिक निधन झाले. (Talegaon Dabhade) या अकस्मिक निधनामुळे तळेगाव दाभाडे शहरातील खांडगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शलाकाच्या पश्चात खांडगे कुटुंबीयांना आधार देणाऱ्या विविध संस्थांच्या वतीने आज खांडगे पेट्रोल समोरील ‘ ईशा हॉटेल ‘ येथे आज शनिवार (दि 23) सायंकाळी 5 वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Car Accident: कार अपघातात चिंचवड पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, समाज प्रेमी आपा प्रतिष्ठान, मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोटरी क्लब ऑफ मावळ, (Talegaon Dabhade) मैत्रेय ग्रुप रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, मावळ तालुका इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपरिचित,मनमिळाऊ अशा कै.शलाका खांडगे यांच्या आठवणींचे जागरण या निमित्ताने सर्व आप्त मान्यवर करणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.