Car Accident: कार अपघातात चिंचवड पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज :  कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. (Car Accident) हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी शुक्रवारी (दि.22) मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. विजय आखाडे या पोलीसाचा मृत्यू झाला आहे. आखाडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

 

Petrol-Diesel Theft: टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 

 

आखाडे हे त्यांच्या कारने (एमएच 14, एफएस 2218) नाशिक फाट्यावरून चाकणच्या दिशेने निघाले होते. आखाडे यांची कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठ्या झाडावर आदळल्याने आखाडे यांचा मृत्यू झाला. (Car Accident) यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.