Petrol-Diesel Theft: टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

13 टँकरसह पाच आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर येथील बीपीसीएल डेपोतून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Petrol-diesel) या टोळीचा पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा गुन्हे विभागाने पर्दाफाश केला आहे.

 

या रॅकेटचा म्होरक्या बालाजी मधुकर बजबळकर, त्याचा भाऊ दत्तात्रय गजेंद्र बजबळकर,सहकारी उत्तम विजय गायकवाड, टँकर पुरवणारा अजिंक्य मारुती शिरसाट, टँकर ट्रान्सपोर्टचा मॅनेजर साहिल दिलीप तुपे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडच्या आकांक्षा पिंगळेला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकाळभोर परिसरातील एचपीएल,बीपीसीएल व इंडियन ऑईल अशा तीनही डेपोतून रोज सुमारे सातशे ते आठशे टँकर भरून बाहेर पडतात. (Petrol-diesel Theft) याच टँकरच्या भरतीवेळी व सप्लायकरत असताना तांत्रीक गोष्टींव्दारे पेट्रोल व डिझेलची चोरी केली जात होती. याबाबत पोलिसांना संशय होता त्यानुसार पोलिसांनी बीपीसीएल डेपो येथून आरोपींना अटक केली आहे. यावेळी 13 टँकर व 2 पितळी डिपरॉड जप्त करण्यात आला आहे.

 

डुप्लिकेट डिप रॉडचा वपार करुन मोजणीत फेरफार करणे, ऑटोमाईज्ड कॅरीबल सिस्टीम असातानाही बकेटचा वापर करणे, टँकरच्या फॅब्रीकेशन डिजाईनमध्ये फेरफार करणे, (Petrol-diesel Theft) टँकरच्या कप्प्यात कॅव्हिटी निर्माण करुन त्याद्वारे पेट्रोल व डिझेलची हेराफेरी करणे, व्हेईकल ट्रेकींग सिस्टीम मधील अलर्टकडे दुर्लक्ष करणे ईव्हॅपोरायजेशन रिपोर्ट मधील गैरव्यवहार, टेंडर सिस्टीम व अटोमाइज्ड अलोकेशन मधील हेरोफेरी करणे या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हेराफेरी मध्ये करोडो रुपयांचा अपहार होत होता. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.