Agrawal Samaj: अग्रवाल समाज खडकीच्या वतीने तिज निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज: अग्रवाल समाज खडकीच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिज निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Agrawal Samaj) या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध आकर्षक स्पर्धा तसेच खेळ ठेवण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी सहभाग घेतला.

 

 

कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण आणि राधाच्या वेशभूषा केलेल्या सर्व बालक आणि तरूणींनी सर्वांचे मन मोहुन घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव, अॅडव्होकेट पूजा सहारे, आरती मेस्त्री, भारतीय जनता पार्टीचे महिला सरचिटणीस मनिषा कांबळे उपस्थित होते.

 

 

 

Crime News : पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून एक लाखाची फसवणूक

 

कार्यक्रमामध्ये रजनी गुप्ता यांनी विविधांगी कार्यक्रम सादर केले. श्रावण महिन्यांवर फिल्मी गीत, मोठे मंगळसूत्र, मोठी टिकली, जास्त बांगडय़ा, मोठा टिक्का, ड्रेस कोड, श्रावण हिरवा ड्रेस, डान्स स्पर्धा, गरबा, फिल्म डान्स तसेच तंबोलाचे आयोजन करण्यात आले हाेते. सर्व खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.(Agrawal Samaj) स्पर्धेमधील विजेत्यांना सुमन अग्रवाल, आरती अग्रवाल, रिचा अग्रवाल, प्रियांका अग्रवाल, रीना गोयल, सिमा बंसल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण तसेच राधाचे आकर्षक पेहराव केलेल्या बालक आणि मुलीं कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमास अग्रवाल समाज खडकीच्या नवीन ट्रस्टींमध्ये उपाध्यक्ष पवन अग्रवाल, सचिव राहुल अग्रवाल, कोषाध्यक्ष मनीष गोयल, आरक्षण भंडार प्रमुख प्रमोद बन्सल, उत्सव प्रमुख पूर्णेश अग्रवाल, धर्मशाला प्रमुख मुकेश अग्रवाल यांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल अगरवाल, दिपाली अग्रवाल, योगिता मित्तल, पूनम गोयल, मीना अग्रवाल, लीना अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.