Crime News : पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – दिल्ली पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याचे भासवून पासपोर्ट त्याच दिवशी मिळण्यासाठी लिंकवर माहिती भरण्यास सांगून महिलेची एक लाखाची फसवणूक केली. ही घटना आकुर्डी येथे २ जुलै रोजी सकाळी घडली.

 

याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि.1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 9163857509 या मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना आरोपीने 9163857509 या क्रमांकावर फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो दिल्ली पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याचे भासवले. फिर्यादीला पासपोर्ट आला असल्याचे सांगितले. पासपोर्ट लगेचच त्याच दिवशी मिळण्यासाठी आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवली. त्या लिंकवर माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या बँकेतून 99 हजार 995 रुपये काढून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.