Crime News : रिक्षा चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षा चालकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटले आहे. ही घटना सोमवारी (दि.1) पहाटे चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

 

हणुमंत लक्ष्मण थोरात (वय 45 रा.फुगेवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तीन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीहे त्यांची रिक्षा एमएच 14 एचएम 6128 घेऊन पिंपळे गुरव येथील पेरुच्या बागेजवळून जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेले तीन अज्ञात इसम यांनी फिर्यादींची रिक्षा थांबवली. त्यांनी त्यांचे चेहरे रुमालाने बांधले होते. यावेळी त्यांनी फिर्यादी यांना पिंपळे निलखला रस्ता कोठून जातो म्हणून पत्ता विचारला.फिर्यादी जवळ येवून पत्ता सांगत असताना चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जवळील मोबाईल घेऊन पळून गेले.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.