23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Kalewadi News : आरोग्य शिबिराला प्रतिसाद

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 100 हून जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

काळेवाडी येथील इंदिरानगर मध्ये सोमवारी हे शिबिर झाले. सुरुवातीला जयंती उत्सव समितीचे सोमनाथ जगताप, स्व.तात्या बापट समितीचे डॉ.संजीव संभूस व मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आरोग्य शिबिरात 4 पुरुष व 1 महिला वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूने आरोग्य तपासणी केली.

100 हून जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. शिबीर आयोजनासाठी स्व.तात्या बापट स्मृती समिती, भारतीय स्त्री शक्ती , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

spot_img
Latest news
Related news