Pimpri : अहिल्याबाईंनी औद्योगिक धोरणातून रोजगार निर्मिती केली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – आपल्या राज्यातील प्रजेला रोजगार निर्माण व्हावा म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी औद्योगिक धोरण स्वीकारले. त्या पद्धतीने नियोजन आखले संपूर्ण भारत भरात विहिरी, तलाव , रस्ते आणि विकास कामाच्या माध्यमातून प्रजेतील गरिबांना कामगारांना सुखाने जगता यावे अशी व्यवस्था निर्माण केली. त्याचबरोबर कामगार, मजूर, कारागीर, साहित्यिक यांना रोजगारसह जमिनी व घरे उपलब्ध करून देणाऱ्या आदर्शवत राज्यकर्त्या होत्या असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पिंपरीत (Pimpri )व्यक्त केले.
Pune : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांना मिळणार 100 कोटी रुपयांचा निधी
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त महासंघाचे चिंचवड येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी राजू बिराजदार, बालाजी लोखंडे, किरण साडेकर, संदीप कुमार, सुखदेव कांबळे, परमेश्वर बिराजदार, नाना कसबे, शंकर साळुंखे, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.
अहिल्याबाईंनी केलेले सामाजिक कार्य आदर्शवत होते. त्यांनी राज्यकारभार अत्यंत हिरिरीने करून दाखवला. शत्रू देखील त्यांच्याबद्दल आदर बाळगत होते. रस्ते, धर्मशाळा बांधणे अन्नछत्रे चालवणे अशा अनेक लोक उपयोगी उपक्रम अहिल्याबाईंनी केले. अहिल्याबाई एक स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या , स्वाभिमानी दक्ष व आणि योग्य न्याय देण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध होत्या असे गौरवोद्गार नखाते यांनी (Pimpri) पिंपरीत काढले.