Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन गटांत पदांवरुन कुरघोड्या

एमपीसी न्यूज – काल अजित पवार आणि 9 प्रमुख नेते राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजप शिंदे सरकारला सामील (Ajit Pawar)  झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन गटात कुरघोड्या सुरु झाल्या आहेत. काल अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार गटाने या मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून या संबंधीत पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

Chinchwad : न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार

तर अजित पवारांसह गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेत असल्याचे जाहीर केले. जितेंद्र आव्हाड हे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेते म्हणून अपात्र असल्याचेही म्हटले आहे. विरोधीपक्ष नेत्याची निवड ही विधानसभा अध्यक्षांकडून केली जाते. ज्या विरोधीपक्षाकडे जास्त आमदार असतात त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असं म्हणत त्यांच्या अपात्रतेचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आले आहे .

तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती केली (Ajit Pawar) आहे. तर पक्षातील इतर पदांवरील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.