Akurdi : राष्ट्रवादीचे नाल्यात बसून उपोषण

एमपीसी न्यूज – आकुर्डी भागातील नालेसफाई (Akurdi) वेळोवेळी होत नसल्याने राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी नाल्यात बसून उपोषण केले.

आकुर्डी भागातील नाले सफाई वेळोवेळी होत नाही. आरोग्य विभागाला वारंवार सूचना देऊन देखील दखल घेत नसल्याने सय्यद यांनी उपोषण केले. उपोषणस्थळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांची  उपस्थिती लक्षणीय होती. उपोषणाला माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, मनसेचे संघटक के. के. कांबळे आदींनी भेट दिली.

तत्पूर्वी पहाटे लवकरच 25 ते 30 आरोग्य कर्मचारी नाल्यात उतरून साफ सफाई करून घेत असल्याचे दिसून आले.  अ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे , आरोग्य निरीक्षक साळवे, आरोग्य सहायक शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विंनती केली.(Akurdi)  राष्ट्रवादीचे इखलास सय्यद यांनी लेखी  आश्वासन द्या तरच मागे घेऊ अशी भूमिका घेतल्यानंतर आरोग्य विभागाने सात दिवसाच्या आत सर्व नाले सफाई करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि  माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ  यांच्या शिस्टाई नंतर उपोषण मागे घेत असल्याची घोषणा इखलास सय्यद यांनी केली.

 

या उपोषणाला ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा कुराहडे, अण्णा भोसले, प्रकाश परदेशी,फैज शेख, गौतम बेंद्रे,वसंत सोनार,यशवंत भालेराव,हरिभाऊ हांडे,चंद्रकांत इंगळे,सतिश सिलम, सुनील मोरे,सुरज मोरे, जिब्राईल शेख, रुपेश जोशी, किरण वाळुंज ,भास्कर म्हस्के, संजना सुर्वे,प्राजक्ता वाहळकर, (Akurdi) विमल हांडे,अलका परदेशी,आशा साले,स्वाती म्हस्के,शोभा राऊत,अनिता पवार,मंगल खवले,अपेक्षा ठोंबरे,नीलम गडदे आदी उपस्थित होते. सात दिवसात नाले सफाई न झाल्यास पुन्हा नाल्यात 5 दिवसाचे उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी सय्यद यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.