Alandi : रसिकलाल धारिवाल सभागृहात सह्याद्री इंटरनॅशनल स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) देवाची येथे रसिकलाल धारिवाल सभागृहामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वोच्च शक्ती वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन सह्याद्री इंटरनॅशनल स्कुलने केले होते.

Chinchwad News : श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रा रविवारपासून प्रारंभ

या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वार्षिक स्नेहसंमेलनात लहानांपासून मोठ्या विद्यार्थ्यांनी आपले कला कौशल्य गीताद्वारे, नृत्याद्वारे सादर केले. उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवर पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रतिसाद दिला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश गरुड व (Alandi) सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थेमधील मान्यवर प्रकाश कुऱ्हाडे, मुंडे, विजुभाऊ गावडे, अर्चना घुंडरे, राजू भेगडे, आप्पा लोखंडे, श्रीकांत बोरावके, दिनेश कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, काळे व या संस्थेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.