Alandi : कार रेंटने देण्याच्या बहाण्याने घेतली क्रेडिट कार्डची माहिती, तरुणाची 43 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – रेंटने कार देण्याच्या (Alandi) बहाण्याने एका तरुणाच्या क्रेडीट कार्डची माहिती घेत त्याद्वारे त्याची 43 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 12 ऑगस्ट रोजी चिंबळी येथे घडला आहे.

याप्रकरणी  30 वर्षीय तरुणाने  शुक्रवारी (दि.1) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून अमित शर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने तो श्रीराम कार रेंटल कंपनीतून अमित शर्मा बोलत असल्याचे सांगून त्याने कार रेंटने कार देण्याचा बहाणा केला.

यासाठी त्याने फिर्यादीच्या व्हाट्सअप वर htt://shriramcarrental.in// या लिंक पाठवत त्यावर वैयक्तीक माहिती व क्रेडिट कार्डची माहिती घेत 150 रुपये पाठवण्यास सांगितले.

त्यावरून त्याने 43 हजार रुपयांचा परस्पर व्यवहार करून फिर्यादीची फसवणूक केली. यावरून आळंदी पोलीस पुढील तपास करत (Alandi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.