Thergaon : कारमध्ये बसलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला, एकाला अटक

एमपीसी न्यूज – कारमध्ये गप्पा मारत (Thergaon) बसलेल्या तरुणावर एकाने कोयत्याने हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो तरुण यात वाचला.याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.31) रोजी थेरगाव येथे घडली आहे.
अतुल शाम यादव (वय 25 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. यावरून दिशांत संतोष तापकीर (वय 23 रा.तापकीर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : कार रेंटने देण्याच्या बहाण्याने घेतली क्रेडिट कार्डची माहिती, तरुणाची 43 हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची कार पार्क करून त्यांच्या तरुणीसह गाडीमध्ये बसले होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी तो वार चुकवला म्हणून ते वाचले. आरोपीच्या मनात जुन्या भांडणचा राग असल्याने त्याने फिर्यादी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Thergaon) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.