YCMH : एआरटी केंद्र बंद करू नका; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – गेल्या 15 वर्षांपासून वायसीएम (YCMH ) रूग्णालयातील एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी एआरटी केंद्र बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे केंद्र पीपीपी तत्वावर चालवले जात आहे. त्यामुळे हे केंद्र बंद न करता सुरू ठेवा, अशी मागणी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) शिष्टमंडळाने केली आहे.

Pune : गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी नियमावली पुणे महापालिकेकडून जाहीर  

याबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने वायसीएम रूग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले.  राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र सरकारच्या एड्‌स कंट्रोल विभागाकडे वायसीएम रुग्णालयाच्या एआरटी केंद्राची रुग्णांना तपासण्याची क्षमता कमी न करता वाढवावी यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रुग्णांना सेवा देणारे केंद्र बंद करू नये.

काही रुग्णांना जवळच्या केंद्रात औषध उपचारांसाठी पाठवले जाईल. तसेच वाय. सी. एम.च्या या केंद्रात जिल्ह्यातीलच काय पण महाराष्ट्रातील कोणत्याही एचआयव्ही ग्रस्त रुग्णाला उपचार न देता परत पाठवले जाणार नाही, त्यांची अडवणूक केली जाणार (YCMH ) नसल्याचे डॉ. वाबळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.