Alandi : दमयंती कुऱ्हाडे निवास परिसर सलग 26 दिवस पाणीपुरवठयाविना!

एमपीसी न्यूज : आळंदी येथील पद्मावती रस्त्यावरील (Alandi) दमयंती कुऱ्हाडे निवास परिसरात सलग 26 दिवस पाणी नसल्याने तेथील नागरिकांना पाण्याविना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तीर्थक्षेत्र आराखड्यातून जलवाहिनी टाकताना दमयंती कुऱ्हाडे निवस्थानाजवळ टी टाकताना त्यामध्ये पाईप अर्ध्यापर्यंत घुसवला होता. तेथील नागरिकांच्या वारंवार तक्रारी पालिकेत येत असल्यामुळे तेथील खोदकाम करताना ही समस्या आढळून आली.

ती समस्या पालिकेमार्फत सोडवली असली तरी त्या पाईपलाइनमधून अजूनपर्यंत तेथील नागरिकांना पाणीपुरवठा झाला नाही. याबाबतची माहिती दिलीप कुऱ्हाडे यांनी दिली.

पद्मावती रस्त्यावर पीडब्लूडीचे काम चालू आहे. त्यामुळे तेथील समस्या आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असून पीडब्लूडीवाले ती समस्या सोडवण्यासाठी तयार आहेत. परंतु, अपुऱ्या साहित्याअभावी तेथील समस्या सोडू शकत नाही. त्यासाठी पालिकेने सहकार्य करावे. असे तेथील नागरिकांना ठेकेदाराने सांगितले.

PCMC : सावधान! पीसीएमसी कॉलनीमधली ‘ही’ इमारत ठरली धोकादायक!

पाणीपुरवठा आधिकारी शिरगिरे यावेळी म्हणाले, पालिकेमार्फत साहित्य पुरवण्यात येईल. तेथील समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे सहकार्य मिळेल. पीडब्लूडी व पालिका प्रशासनात तेथील (Alandi) कामाबाबत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
तो समनव्य साधला जावा. असे तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच पाणी पुरवठा होतो, तेव्हा त्या भागात अनेक बेकायदेशीरपणे पाण्याच्या मोटारी चालू असतात.

तसेच दमयंती कुऱ्हाडे यावेळी म्हणाल्या, येथील भागात पाणीपुरवठा का होऊ शकत नाही? याचा शोध पालिकेमार्फत घेण्यात यावा. या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पालिकेकेने त्वरित तोडगा काढावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.